मणिपूर घटने प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी लोकायात यांच्या वतीने निषेध आंदोलन

वडारवाडी : मणिपूर घटनेप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी(असंगठीत कामगार कर्मचारी, अनुसूचित जाती विभाग, अल्पसंख्यांक विभाग)लोकायात यांनी वडारवाडीत निषेध आंदोलन घेतले

मणिपूर मधील घडणाऱ्या घटना पाहता येणारी पिढीसाठी कुठला समाज निर्माण करतोय असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड. अभय छाजेड यांनी उपस्थित केला. निमित्त होते अशांत मणिपुरच्या घडणाऱ्या घटनांच्या निषेधार्थ जात, धर्म, लिंग, भाषा या भेदांच्या पलीकडे जाऊन म्हणून आपण एक माणूस म्हणून विचार करणार की नाही आत्मचिंतन करण्याची आज गरज आहे असं पुढे ते म्हणाले
महाराष्ट्र प्रदेश असंघटित काँग्रेसचे अध्यक्ष सुनील शिंदे म्हणाले की दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्याची घटना असो की दिवंगत स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीला जिवंत जाळल्याची घटना या माणुसकीच्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना आहेत.राहुल वंजारी यांनी याप्रसंगी देश अराजकते कडे निघाला आहे गाई साठी रस्त्यावर येणारा समाज आमच्या माय भगिनीं वर अत्याचार होत असताना मूग गिळून बसला आहे.लोकायतच्या कार्यकर्त्या कल्याणी दुर्गा रविंद्र म्हणाल्या की आज देशभरात धर्म, जातीच्या मुद्द्यांवरून लोकांना आपापसात लढवलं जात आहे आणि काही मूठभर कंपन्यांसाठी देश चालवला जात आहे. आपल्याला महागाई, बेरोजगारी या मुद्यांपासून भटकवलं जात आहे.

बिरेन सिंह इस्तीफा दो, मोदी सरकार शर्म करो, सामील व्हा सामील व्हा मणिपूरसाठी सामील व्हा अशा घोषणा यावेळी घेण्यात आल्या.

यावेळी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष यासिन शेख,प्रदेश /शहर पदाधिकारी जावेद भाई निलगर,कैलास मंजाळकर,अस्लम मिरजकर चव्हाण,गणेश गुगळे, निसार शेख,आकाश कांबळे, संजय मोरे,अजित जाधव , एस के पळसे,घनश्याम निम्हण,हर्षेद्र वाघमारे, योगेश वंजारी,राजू बजेरी,अभिजीत बाबर, चिंटू चव्हाण,पेशने, आकाश रेणुसे, आशिष गुंजाळ,पौर्णिमा भगत,लोकायतचे कार्यकर्ते श्रीकुष्ण कुलकर्णी, ऋषिकेश येवलेकर, संतोष पवार, मंगल निकम उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वर्षा सपकाळ यांनी केलं. भर पावसातही नागरिक या आंदोलनात सहभागी झाले.

See also  बाणेरमधील शिवरायांच्या स्मारकाजवळ कचरा टाकल्यास कठोर कारवाई करणार! पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा