डेंग्यू व चिकनगुनिया आजारांसाठी औंध बाणेर पाषाण परिसरात फवारणी करण्यात यावी नागरिकांची मोहल्ला कमिटीत मागणी

औंध : मासिक मोहल्ला समिती बैठक औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समिती हॉल येथे महापालिका सहाय्यक आयुक्त, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मिटिंग आयोजित करण्यात आली होती.

यावेळी औंध , बाणेर , बालेवाडी , बोपोडी , पाषाण , सोमेश्वर वाडी , महाळुंगे  येथील नागरिकांनी अधिकाऱ्यां समोर सहाय्यक आयुक्त यांच्या समोर खालील समस्या मांडल्या  विद्यार्थ्यांच्या सुरक्षे साठी सर्व शाळेत cctv कॅमेरे लावावे अशी मागणी गणेश कलापुरे यांनी केली.


रस्त्यावर पडलेले खड्डे , कचरा समस्या ,  अतिक्रमण ,  नदी स्वछता , सार्वजनिक स्वच्छतागृह ,  बंद पडलेले जलतरण तलाव ,  डेंग्यू चिकनगुनिया यांच्या आजाराचे प्रतिबंध होण्यासाठी कीटक नाशक फवारणी ,  वाहतूक समस्या ,  गणेशोत्सव निमित्त स्वच्छता पुर्व तयारी , विसर्जन घाट स्वच्छता ,  पाषाण सुतारवाडी कब्रस्तान अतिक्रमण ,  भीमसेन जोशी सभागृह येथे अनधिकृत होणारे कार्यक्रम ,  रस्त्यावर विजेचा ओव्हर हेड वायर खांबाचा प्रकाश व्यवस्था , औंधच्या कचरा समस्या सोडवण्यासाठी घंटागाडी ची मागणी नागरिकांनी केली.


यावेळी सहाय्यक आयुक्त गिरीष दापकेकर, गणेश कलापुरे , रोहिणी नागवणकर ,  रुपेश जुनवणे , प्रीती काळे ,  नितीन खोंड ,  निलेश जुनवणे ,  सिद्धेश्वर गायकवाड , यार्दी संस्थेच्या विविध वस्त्यामध्ये काम करणाऱ्या सेविका  आणि अनेक गृहसंस्थाचे सदस्य उपस्थित होते.

See also  राज्यघटना सगळ्यांना माणूस म्हणून समृध्द करते : प्राचार्य डाॅ संजय खरात