पाषाण : अमोल बालवडकर फाऊंडेशनतर्फे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील समस्त माता भगिनींसाठी “खेळ रंगला पैठणीचा व मंगळागौर” कार्यक्रम रविवार दि.०१ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता ज्ञानदिप मंगल कार्यालय, बालाजी चौक, पाषाण येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात अभिनेत्री अभिज्ञा भावे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच कार्यक्रमाचे सादरकर्ते सेलिब्रिटी अँकर आर. जे. अक्षय हे असणार आहेत. आकर्षक बक्षिसे, लकी ड्रॉ कूपन आणि प्रत्येक उपस्थित भगिनिला आकर्षक भेट वस्तू देखील दिली जाणार आहे. प्रथम बक्षीस TVS Scooty Zest, द्वितीय बक्षीस सॅमसंग LED TV, तृतीय बक्षीस LG फ्रिज, चतुर्थ बक्षीस Godrej वॉशिंग मशीन आणि पाचवे बक्षीस हे फिलिप्स चे मिक्सर असणार आहे.
या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिला भगिनींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि वरील आकर्षक बक्षिसे जिंकावीत व मनसोक्तपणे कार्यक्रमाचा आनंद लुटावा असे आवाहन अमोल बालवडकर फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: 8307079494
नगरसेवक अमोल बालवडकर जनसंपर्क कार्यालय,
१)बाणेर – क्रोमा शोरुम शेजारी, बाणेर-म्हाळुंगे रोड, बाणेर २)बालेवाडी – ममता चौक, भारती विद्यापिठ शाळेसमोर, बालेवाडी