डॉ.तुषार पोपटलाल चौधरी यांचे निधन

पाषाण : पाषाण औंध येथे वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेले डॉ.तुषार पोपटलाल चौधरी, वय ७३ रा.बाणेर,पुणे यांचे आज शुक्रवार, दि ३०/०८/२०२४ रोजी  पहाटे हृदयविकारच्या धक्क्याने  निधन झाले.

पाषाण औंध बाणेर परिसरात सुमारे  चार दशकांहून अधिक वर्षे ते वैद्यकीय सेवेत कार्यरत होते. पाषाण परिसरात गरिबांचे डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध होते. सर्वसामान्य रुग्णांना आपल्या सेवेतून मदत करत त्यांनी नागरिकांशी आपूलकीची भावना निर्माण केली होती.

त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सर्व सामान्यांचे डॉक्टर हरपल्याची भावना यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली.

See also  पुणे विधानपरिषद मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी; विक्रम काकडेंच्या उमेदवारीला विरोध