“श्री गजानन मंडळाच्या श्री गणेशाच्या चरणी ५ किलो चांदीचा हिरेजडित मुकुट अर्पण”

पुणे, दि. ९ (प्रतिनिधी) – आज श्री गणेश उत्सवाच्या निमित्ताने “श्री गजानन मंडळाच्या श्री गणेशाच्या चरणी मंडळाचे सदस्य सदानंद जोशी आणि मृदुला जोशी यांच्या परिवाराकडून स्व. मंगला माधव जोशी यांच्या स्मरणार्थ चांदीचा ५ किलो चांदीचा हिरेजडित मुकुट अर्पण करण्यात आला.


गणपती उत्सवाचे वातावरण संपूर्ण शहरात पहिल्याच दिवसापासून सुरू झाले असताना पुण्यातील नारायण पेठेतील लक्ष्मी रस्त्यावरील विजय टॉकीज चौकात असलेल्या श्री गजानन मंडळाने यंदा ८२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. 
यावेळी पहिल्याच दिवशी सदानंद जोशी परिवाराकडुन ५ किलो चांदीचा मुकुट श्री गजानन चरणी अर्पण करण्यात आला. यावेळी झालेल्या अर्पण सोहळ्यात श्री गजानन मंडळ अध्यक्ष राकेश गाडे पाटील, उत्सव प्रमुख अमेय गाडे पाटील, सदानंद जोशी, स्वप्नील पगारीया, शशांक पाचंगे, हर्षल पाचंगे, ओंकार भोसले, सारंग भिरंगी, मनोज मोरे, सचिन पाचंगे, राजाभाऊ ऐतोळे,शुभम जैन, महेश जाधव , प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र गोळे आदी मान्यवर उपस्थित होते.


बेळगांव येथील सुप्रसिध्द मुर्तीकार श्री नागेश शिल्पी पंडीत यांनी पुणे शहरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा सह गणरायाच्या एकूण नऊ घडवल्या, त्यातील नारायण पेठेतील लक्ष्मी रस्त्यावरील श्री गजानन मंडळ या दिग्गज मंडळांची गणरायाची श्रीं ची मुर्ती खग्रास सूर्यग्रहणात घडवलेली श्री सिद्धिविनायक गजानन मुर्ती आहे.
स्थापनेच्या  पहिल्या दिवशी श्री गजानन मंडळांच्या कार्यकर्त्यांनी “श्री गणपती बप्पा” च्या नावाचा एकच जल्लोष करत, शेकडो महिला बाल गोपाळसह गणेश भक्तांनी, “आवाज मुळशीचा” या ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीत एकीचे दर्शन घडविले.

See also  महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना