सेवा पंधरवडा निमित्त भाजपा तर्फे आरोग्य शिबिर

पाषाण : भाजप तर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर सेवा पंधरवडा साजरा होत आहे,त्याचाच एक भाग म्हणुन,राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री,आमदार श्री चंद्रकांतदादा पाटिल व सेवा समर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री राजेश पांडे यांचा सहयोगाने,सुतारवाडी येथील शिवनगर मधे मोफत आरोग्य शिबिराचे पुणे शहर भाजप सचिव श्री राहुल कोकाटे व मयुरीताई कोकाटे यांनी आयोजन केले होते.या शिबिरात मोफत नेत्र तपासणी,रक्तदाब,शुगर,दंत तपासणी,महिलांसाठी चेस्ट X रे आदि तपासण्या मोफत ठेवण्यात आल्या होत्या.


या शिबिराचे उद्घाटन डॉ जगदीश तोषणीवाल, उद्योजक श्री गोविंद रणपिसे, श्री राजाभाऊ सुतार,श्री अमित सुतार,श्री मनोज धायगुडे, श्री रत्नाकर मानकर,श्री गिरीश चोक,श्री किशोर मोरे यांचा उपस्थित करण्यात आले,परिसरातील २०० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.


श्री उत्तम जाधव,श्री  प्रमोद कांबळे,सौ वंदना सिंग,सौ प्रियंका पेंडसे,यश सांगडे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

See also  शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार