हडपसर : राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि मराठ्यांना आरक्षण मिळावे तसेच मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे लाखो मराठा बांधव महासभेसाठी उपस्थित राहणार आहेत, महासभेच्या नियोजन साठी आज हडपसर मध्ये मराठा बांधवांची एक मीटिंग पार पडली, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू असून त्यांच्याच नेतृत्वात ही महासभा होणार आहे. या महासभेसाठी अंतरवाली सराटी येथे हडपसर आणि परिसरातून जवळपास 3000 मराठा बांधव जाणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश टेळेपाटील, संदीप लहानेपाटील यांनी दिली.
तसेच अनेक मराठा बांधव बैठकी साठी उपस्थित होते.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी माननीय मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला आहे. राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि मराठा समाजाच्या इतर अनेक मागण्यांसाठी वार शनिवार 14 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे लाखो मराठा बांधव एकत्र येणार आहे असे संदीप लहाने पाटील यांनी सांगीतले. तसेच त्यांनी हडपसर आणि परिसरातील सर्व मराठा बांधवांना महासभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.