बाणेर परिसरात बेभान वॉटर टँकर चालकांवर लगाम लावणार कोण? टँकरची तपासणी करण्यात यावी तसेच मद्यधुंद चालकांना वाचवणाऱ्या मालकांवर देखील कारवाई करावी

बाणेर : बाणेर परिसरामध्ये पाण्याच्या टँकर चालकांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असल्याचा दिसून येत आहे. दिवसभर बाणेर परिसरामध्ये पाण्याचे टँकर फिरत असलेले दिसून येतात व हे टँकर चालक अत्यंत वेगाने गाडी चालवत असल्यामुळे अनेक नागरिक टँकर जवळ आल्यावर आपला जीव मुठीत घेऊन टँकर जाऊपर्यंत कडेला उभे राहतात. या टँकर चालकांना कोणी हटकल्यास हे टँकर चालक आपल्या स्थानिक रहिवासी मालकाच्या जीवावर नागरिकांना देखील अपशब्द बोलून दमदाटी करतात. तसेच नागरिकांना मारहाण देखील करतात. त्यामुळे अनेक नागरिक यांना बोलण्यास देखील घाबरतात. तसेच वाहतूक पोलिसांकडून देखील या बेदरकार वाहन चालवणाऱ्या टँकर चालकांवर कारवाई होत नाही. त्यामुळे वाहतूक पोलीसच चेरीमरी घेऊन या टँकर चालकांना सोडून देत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. काही दिवसापूर्वी अशाच बेदरकार टँकर चालकामुळे पाषाण परिसरामध्ये एका तरुणाला देखील आपला जीव गमवावा लागला होता.

बाणेर परिसरात दिवसेंदिवस वाढत्या नागरिकांना मुळे तसेच नवीन नवीन होत असलेल्या रहिवासी प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. त्या प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचे टँकर परिसरामध्ये दिवसा तसेच रात्री त्या वेळी देखील फेऱ्या मारत असतात. अनेक सोसायट्यांना या टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत असल्यामुळे परिसरा टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. टँकरची संख्या वाढत आहे परंतू या टँकर चालवण्यासाठी ड्रायव्हरची कमतरता होत असल्यामुळे टँकर मालकांकडून मिळेल त्यास गाडी चालवण्यास देण्यात येत आहे. काही वेळेस तर 18 वर्षाखालील मुले देखील पाण्याचे टँकर चालवत असलेली दिसून येतात तर सर्रास टँकर ड्रायव्हर दारू पिऊन गाडी गाडी चालवत असलेले दिसून येतात. टँकर चालक कोणत्याही प्रकारे वाहतुकीचे नियम पाळत नाहीत तसेच टँकरचे देखील फिटनेस केलेले दिसून येत नाही अनेक टँकर रस्त्याने पाणी सांडत जात असलेले दिसून येतात या पाण्यामुळेच परिसरात अनेक जणांचा गाडी घसरल्यामुळे अपघात होत आहे या अपघातात अनेक जण जखमी देखील होतात परंतु या टँकर चालकांवर मात्र कोणत्याही प्रकारे कारवाई होताना दिसून येत नाही.

See also  कोथरूडमधील धोकादायक नाल्यांची इंडिया फ्रंट आघाडीच्या वतीने प्रत्यक्ष पाहणी

बाणेर येथे एका पत्रकाराने टँकर चालकाला अटकल्यानंतर त्याला रॉडने मारण्याचा प्रयत्न देखील मद्यधुंद चालकाकडून करण्यात आला होता. बाणेर परिसरातील सर्व पाण्याच्या टँकरची तपासणी करून योग्य रीतीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.