कोथरूड मतदार संघावर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रचाराचा नारळ फोडून कामाला लागला – आमदार सचिन आहिर

पाषाण : कोथरूड मतदार संघावर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी पितृपंधरवडा झाला की लगेच प्रचाराचा नारळ फोडून कामाला लागा असे आदेश पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहिर यांनी शिवसैनिकांना पाषाण येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्नेह मेळाव्यात दिले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांमध्ये कोथरूड मतदार संघ शिवसेनेला सुटणार हे निश्चित मानले जात आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोथरूड मतदार संघ व अजय निम्हण मित्रपरिवार यांच्यावतीने पाषाण बाणेर लिंक रोड येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी कृषी मंत्री शशिकांत सुतार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, शहर प्रमुख गजानन थरकुडे, राजेश पळसकर, अजय निम्हण , विभाग प्रमुख संतोष तोंडे, शहर संघटिका ज्योती चांदेरे, सरपंच मयूर भांडे, संजय निम्हण, महेश सुतार, अशोक दळवी, अमोल फाले आदी उपस्थित होते.

यावेळी शिवसेनेमध्ये आमदार सचिन आहेर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रवेश घेण्यात आला. तसेच उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

यावेळी शिवसेना नेते शशिकांत सुतार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी आपले विचार व्यक्त केले.‌ तर सचिन अहिर यांनी दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण यांच्या स्मृतींना यावेळी उजाळा दिला.

या कार्यक्रमास पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वर वाडी, लमाण तांडा, बाणेर,  बालेवाडी परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  वैयक्तिक शेततळ्यासाठी राज्यात ४ हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू