पाषाण येथील गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

पाषाण  : पाषाण येथील कोकाटे तालिम मंडळाने पाषाण,सुतारवाडी,सोमेश्वरवाडी येथील सोसायट्यांसाठी गणेशोत्सव सजावट,सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम स्पर्धा आयोजित केली होती. जा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

पाषाण परिसरातील ४२ सोसायट्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. उत्कृष्ट देखावा विभागात क्रिस्टल गार्डन सोसायटीने  प्रथम क्रमांक पटकावला,सांस्कृतिक विभागात अलंकापुरी सोसायटीने पटकावला,तर सामाजिक विभागात वेन्हेजिया सोसायटीने प्रथम क्रमांक पटकावला.सामाजिक व सांस्कृतिक बांधिलकी जपण्याचे काम उत्सवांतून होत असते,सर्वांचा सहभागतून परिसराचा विकास होत असतो. कोकाटे तालिम मंडळाने आशा स्पर्धांतून सामाजिक एकता राखण्याचे काम केले आहे असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.


पुणे शहर भाजपा सचिव श्री राहुल कोकाटे व भाजप कार्यकर्त्या सौ मयुरी कोकाटे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले. 
श्री उत्तम जाधव,श्री अमोल पाटिल, श्री गिरीश चोक, श्री किशोर मोरे, श्री प्रवीण आमले, श्री विकास पाटिल यांनी स्पर्धेचे यशस्वी संयोजन केले.

See also  सीए दिवसानिमित्त 'आयसीएआय'तर्फे विविध उपक्रम