पाषाण येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार

पाषाण : सकल हिंदू समाजाच्या वतीने पाषाण मध्ये  हिंदू स्वाभिमान सभेचे आयोजन केले होते, सुतारवाडी पाषाण, पुण्यश्वेर , प्रतापगड, विशालगडावर, लोहगड येथील बेकायदेशीर ,अतिक्रमण जमीनदोस्त करण्यासाठी सकल हिदू समाजाच्या वतीने सरकराचे अभिनंदन व नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. 

यावेळी यावेळी ह.भ.प. संग्राम भंडारे यांचे भाषाण झाले.  चंद्रकात पाटील यांनी रामजन्मभूमीच्या आंदोलनातील आठवणींना उजाळा दिला. मातृभूमीच्या रक्षणासाठी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला गनिमी कावा युद्धनीती शिकवली. मातृभूमीची आणि हिंदू धर्माची सेवा हे माझे कर्तव्य आहे, त्यामुळे त्यासाठी सर्वस्व अर्पण करणं हे देखील माझं कर्तव्य आहे, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी यांच्यासह हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  मॉर्डन महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी