पुणे : “प्रेषित मोहम्मद यांच्या जीवनाचा यथार्थ रेखाटन” या पुस्तकात आदरणीय मोहम्मद पैगंबर यांच्या पवित्र व्यक्तिमत्त्वाचे त्यांचे स्वभावाचे त्यांचे चारित्र्याचे वास्तविक रेखाटन डॉ. मोहम्मद ताहीरुल कादरी यांच्या अनेक पुस्तकातून संभाषणातून व संवादातून संकलित केल्या. ह्या पुस्तकात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे सुंदर व आकर्षक रूप, स्वभाव व चारित्र्य, अनुकरणीय आचरण व सदगुणांनी ओतप्रोत जीवनशैली, दया व क्षमा, औदार्य, न्यायप्रियता, मानवतेबद्दल सहानुभूती व करुणा, प्रेम व आपुलकी तसेच त्यांची उत्तुंग शांत व प्रतिष्ठा इ. इत्यादी बाबींचे वास्तविक रेखाटन सादर केले आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषिकांना या पुस्तकाचा मराठी अनुवाद करून प्रेषित महंमद पैगंबर बद्दल इतर धर्मीयांमध्ये असलेल्या गैरसमज दूर व्हावा याकरिता या पुस्तकाचा प्रकाशन करण्यात आले. सावित्रीबाई फुले विश्वविद्यालय येथील प्रोफेसर सौ. शशिकला रॉय यांचे शुभ हस्ते पत्रकार संघ या ठिकाणी पुस्तक प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सौ शशिकला राय यांनी पुस्तक प्रकाशन करताना सांगितले की, सदर पुस्तकाचे 63 शीर्षक आहे वाचकांनी जरूर वाचावा इतरांच्या मनात असलेला द्वेष यामुळे जरूर कमी होईल असे मला वाटते प्रेषित मोहम्मद पैगंबर विधवा आणि अनाथांची काळजी घेत असत त्यांनी आपल्या अनुयायांनाही निराधारांची काळजी घेण्याचे निर्देश दिले होते. या संदर्भात त्यांनी म्हटले की जे कुणी विधवा आणि स्त्रियांची आणि गरिबांची काळजी घेण्यासाठी प्रयत्नशील राहतो, तो परमेश्वराच्या मार्गात सत्य व न्याय साठी संघर्ष करण्यासारखा आहे. अनाथांवर प्रेषित यांचे विशेष लक्ष असे त्यांनी आपल्या अनुयायांना अनाथांचे हक्क विषयी तसेच त्यांना मदत करणे विषयी जाणीव करून दिली. ते म्हणाले, मुस्लिम मधील सर्वात चांगलं घर ते आहे, ज्यात एक अनाथ व्यक्ती राहतो व त्याला चांगली वागणूक दिली जाते. आणि मुस्लिमांमधील सर्वात वाईट घर म्हणजे ज्यात अनाथ राहतो, पण त्याच्याशी वाईट वर्तन केले जातं. गोरगरीब, अनाथ, लोकांसाठी मदतीचा हात पुढे ठेवावे असे प्रेषित मोहम्मद यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे राहुल डंबाळे याप्रसंगी बोलताना सांगितले की
प्रेषित पैगंबर यांनी अनुयायींना वेळेचे महत्व शिकवले. याविषयी त्यांची स्वतःची अनेक उदाहरणे आपल्यासमोर नमुने दाखल आहेत. जरी त्यांनी आपल्या बहुतांशा वेळेची अल्लाची उपासना, आपल्या कुटुंबाची देखभाल व स्वतः करता अशी योग्य प्रमाणात विभागणी केली होती ते आपला बराच वेळ लोकांच्या भल्यासाठी राखून ठेवत. अडचणीत असलेल्या लोकांना मदत करणे आणि त्यांना दिलासा देण्यासाठी या फावल्या वेळेचा वापर करत. त्यांचा बराचसा वेळ साथीदारांना शिकविण्यात व प्रशिक्षणात जात असेल. इस्लाम धर्माने शिक्षणाला खूप महत्त्व दिले आहे कुराण चा पहिला शब्दच ( इक्रा ) आहे. शिका शिक्षणावर मुस्लिम समाजाने भर दिली पाहिजे समाज शिक्षित झालं तर पुढे जातो असे डंबाळे म्हणाले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार, मुशताक दळवी, कलीम अजीम, मुस्तफा करजगी, इब्राहिम यवतमाळ वाला, सत्यवान गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
घर साहित्य/शैक्षणिक “प्रेषित मोहम्मद यांच्या जीवनाचा यथार्थ रेखाटन” या पुस्तकाचे शशिकला रॉय यांच्या हस्ते...