प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने संपूर्ण भारत “एक राष्ट्र” म्हणून उभे राहिले – डॉ. प्रवीण दबडघाव

पुणे : सारसबाग गणपती मंदिरात क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने श्रीराम मंदिराची प्रतिकृती पुणेकरांना बघण्यासाठी खुली करताना मनस्वी आनंद होत आहे असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव म्हणाले. प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने आज संपूर्ण भारत एक राष्ट्र म्हणून उभा राहिला आहे असे सांगतानाच डॉ. दबडघाव यांनी करसेवकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. तब्ब्ल 550 वर्षांच्या संघर्षानंतर आज राम मंदिर उभे रहात आहे व 22 जानेवारी ला अयोध्येत रामलल्ला ची प्राण प्रतिष्ठा होत आहे हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे.


क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने आज सारस बागेतील गणपती मंदिरात अब Normal Home च्या मुलांनी तयार केलेली राममंदिराची प्रतिकृती पुणेकरांना बघण्यासाठी खुली करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष दीपक मानकर,भाजप चे शहर अध्यक्ष धीरज घाटे,शिवसेनेचे शहर अध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे, आर पी आय चे शहर अध्यक्ष संजय सोनावणे, शिवसंग्राम संघटनेचे शहर अध्यक्ष भरत लगड, लोकजनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष संजय आल्हाट, मा. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माजी विरोधी पक्ष नेते दत्ताभाऊ सागरे,आरपीआय चे नेते ऍड. मंदार जोशी,देवदेवेश्वर संस्थान चे अध्यक्ष रमेश भागवत,भाजप झोपडपट्टी आघडीचे अध्यक्ष विशाल पवार, चेतन भालेकर, प्रतीक खर्डेकर, प्रदीप रणदिवे,बाबू खेर,अब Normal home च्या किशोरी पाठक,भाजप शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले, पं.मिलिंद तुळणकर, वांगमय गोडबोले, भाग्यश्री बोरकर, देवदेवेश्वर संस्थान चे विश्वस्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी दीपकभाऊ मानकर यांनी “रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील” हे भक्तीगीत सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. संपूर्ण देश राममय झाला असताना
विशेष मुलांनी रामभक्तीच्या भावनेने श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारली हे विशेष असून म्हणूनच क्रिएटिव्ह फाउंडेशन ने ही प्रतिकृती पुणेकरांना बघण्यासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला असे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.या कार्यास देवदेवेश्वर संस्थान ने साथ दिली याबद्दल मी कृतज्ञ असल्याचे ही खर्डेकर म्हणाले.तसेच आज ह्या लोकार्पणास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह आणि महायुतीतील सर्व घटक पक्षांचे शहर अध्यक्ष उपस्थित राहिले ही प्रभू रामचंद्राची कृपा असल्याचेही महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी सांगितले.यावेळी सर्व शहराध्यक्षांना डॉ. प्रवीण दबडघाव यांच्या हस्ते रामजन्मभूमीचे रामायण हे पुस्तक भेट देण्यात आले.
सर्व पक्षांच्या शहराध्यक्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध क्षेत्रातील कार्यापासून प्रेरणा मिळते असे आवर्जून नमूद केले. यावेळी गणपती ची महा आरती करून गणपती बाप्पा मोरया व जय श्रीराम च्या घोषणा देण्यात आल्या.
प्रभू रामचंद्राच्या अयोध्येतील प्रतिकृतीस आमच्या संस्थेच्या गणपती मंदिरात प्रदर्शनासाठी ठेवता आले हे मी माझे सौभाग्य समजतो असे देवदेवेश्वर संस्थान चे अध्यक्ष रमेश भागवत म्हणाले. तसेच 22 तारखेला संस्थानाच्या सर्व मंदिरात आनंदोत्सव साजरा करणार असल्याचे ही त्यांनी आवर्जून नमूद केले.आज पहिल्याच दिवशी ह्या प्रतिकृती सोबत सेल्फी व फोटो घेण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली.
संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक आणि संयोजन केले, रमेश भागवत यांनी स्वागत सत्कार केले तर मंजुश्री खर्डेकर यांनी

See also  आदित्य ब्रिझ पार्क सोसायटीत ७५ किलो वॅट चा सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन