श्री  देवी चतुःशृंगी मंदिरात घटस्थापना

पुणे :  श्री देवी चतुःशृंगी मंदिरात  शारदीय नवरात्राचा प्रारंभ आज आश्विन शुद्घ प्रतिपदेला सकाळी नऊ वाजता घटस्थापनेने करण्यात आला.

मंदिर व्यवस्थापक  देवेंद्र देवदत्त अनगळ  यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. श्रीराम नारायण कानडे गुरूजी यांनी पौरोहित्य केले. अभिषेक, रूद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर महाआरती करण्यात आली  शंखनाद करण्यात आला. मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.

See also  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अवमानकारक वक्तव्‍य केल्याबद्दल माफी मागावी - खा. रजनीताई पाटील केंद्रीय