बाणेर : दरवर्षी प्रमाणे रा. स्व. संघ बाणेर बालेवाडी नगराने रविवारी दि.२ नोव्हेंबर रोजी दिवाळी फराळ कार्यक्रम साफा बॅक्केट हॉल मध्ये आयोजित केला होता. विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक त्याला उपस्थित होते. सन्माननीय नागरिकांचे दिवाळी फराळाने स्वागत केले गेले.
तसेच त्यांना संघाच्या शताब्दी निमित्ताने पंच परीवर्तनाचे ठळक बिंदू सांगण्यात आले.
कार्यक्रमात संघाचे कुटुंब प्रबोधन आणि लोक विकास मंडळाच्या सेवा प्रकल्पाची प्रदर्शनी ठेवण्यात आली होती.























