पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने ६ ऑक्टोबर रोजी शिवस्मारक शोधमोहीम पुकारण्यात आली आहे.
२०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवस्मारकाचे जलपूजन केले होते, परंतु ८ वर्षे झाले तरी कोणतेही काम झालेले नाही. प्रत्यक्षात कामही सुरु झालेले नाही, मात्र शेकडो कोटी रुपयांचा निधी खर्च झालेला आहे. याबाबत स्वराज्य पक्षाच्या वतीने ‘भाजपा – शिवसेना सरकारचे हेच का अच्छे दिन?’ अशा अशायचे बॅनर मुंबई, पुणे सह संपुर्ण महाराष्ट्रभरात लावण्यात आले होते.
परंतु मुंबई पालिका प्रशासन, पोलीसांनी बोर्ड काढले, टेम्पो जप्त केले, कामगारांना मारहाण केली, ज्या बोटीतून अरबी समुद्रात जाणार होते त्या बोट मालकांना बोलवून धमकावले, पदाधिकाऱ्यांना नोटीस दिल्या, याविरोधात छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले.
पंतप्रधान पदावरील व्यक्ती शिवस्मारकाचे जलपूजन करतात, मात्र त्यापूर्वी परवानगी का घेतल्या जात नाहीत? पर्यावरणीय निकषांची पुर्तता का केली जात नाही? गडकोटांसाठी राज्यकर्ते काहीच करत नाहीत.. असे म्हणत संभाजीराजे यांनी जोरदार टिका केली, स्वराज्य भवन, पुणे येथील पत्रकार परिषद मधून संभाजीराजे बोलत होते.
आंदोलनाची रुपरेषेबाबत पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी माहिती दिली,
सकाळी ६.३० वा. छत्रपती संभाजीराजे, स्वराज्य भवन पुणे येथून कार्यकर्त्यांसह चारचाकी वाहनाने निघणार आहेत.
सकाळी ९ वा. नवी मुंबई येथे नाशिक, मुंबई, पुणे व महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांसह एकत्रितपणे मुंबई कडे रवाना होतील.
सकाळी ९.३० वा. चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण
सकाळी १० वा. गेट वे ऑफ इंडिया येथे आगमन व बोटीने अरबी समुद्रात शिवस्मारकाचा शोध घेण्यास रवाना…
मार्ग
(स्वराज्य भवन, पुणे – विद्यापीठ चौक – मुकाई चौक रावेत – नवीन एक्स्प्रेसवे मार्गे लोणावळा – नवी मुंबई – चेंबूर – ईस्टर्न फ्री – गेट वे ऑफ इंडिया)