युवाशक्ती सोशल फाउंडेशन च्या वतीने ‘फुले’ चित्रपटाचा महिलांसाठी मोफत

पाषाण : युवाशक्ती सोशल फाउंडेशन च्या वतीने एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त महिलांसाठी ‘फुले’ चित्रपटाचे मोफत शोचे आयोजन राहुल थिएटर शिवाजीनगर येथे करण्यात आले आहे.

आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र युवक उपाअध्यक्ष संतोष गायकवाड, उद्योजक कीर्ती काळे, अमित खानेकर, समीर उत्तरकर यांच्या वतीने या मोफत शोचे आयोजन करण्यात आले आहे.

स्त्री शिक्षण व समाजातील जाती धर्माच्या अन्यायाविरुद्ध लढा देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य सध्याच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून ज्ञात व्हावे यासाठी महिलांसाठी मोफत ‘फुले’ चित्रपटाच्या शोचे आयोजन करण्यात आले आहे असे आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र युवा उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांनी सांगितले.

See also  मानव कल्याण, मनःशांतीसाठी जाणिवेच्या कक्षा अधिक रुंद व्हाव्यात - डॉ. टोनी नेडर यांचे मत; डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठातर्फे विशेष दीक्षांत सोहळ्यात डॉ. नेडर, डॉ. सरदेशमुख मानद डॉक्टरेट प्रदान