गुलटेकडी महर्षीनगर शौर्य जागरण यात्रेचे फुले व पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले.

गुलटेकडी :गुलटेकडी महर्षीनगर शौर्य जागरण यात्रेचे फुले व पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. ३५०वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा व विश्व हिंदू परिषदेच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त शंकर महाराज मठ ते सारसबाग शौर्य जागरण यात्रेचे बुधवारी (दि. ११) सकाळी (महर्षिनगर) येथे आगमन झाले. या वेळी गुलाबाची पुष्प उष्टी करत व संपूर्ण दिवस चालेल असे मोठी उदबत्ती रथात भेट देण्यात आली आणि फुलांच्या उधळणीत यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.


किल्ले शिवनेरीहून ते पुणे निघालेली शौर्य जागरण यात्रा इंदापूर, बारामतीहून जेजुरीत पुणे मंगळवारी दाखल झाली. सकाळी ११:०० च्या सुमारास गुलटेकडी गिरीधर भवन चौकात यात्रेचे आगमन झाले. या वेळी शिवभक्तांनी गुलाबाच्या पाकळ्या, रंगीबेरंगी फुलांची उधळण आणि शिवाजी महाराजांचा जयजयकार करून स्वागत केले. पश्चिम महाराष्ट्र विश्व हिंदू परिषदेचे विनायक पारली भाजपाचे गणेश शेरला आदि या वेळी उपस्थित होते.

यात्रेत विश्व हिंदू परिषदेचे विनायक पारली,नाना क्षीरसागर,दत्ता उभे, तुळशीराम उनेचा, भाजपा झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष गणेश शेरला व एकता सेवा प्रतिष्ठानचे स्वाती शेरला,शारदा पंलगे,नसीम शेख, सुजाता वर्मा,माजी नगरसेवक भरत वैरागे,किरण वैष्णव,रमेश बिबवे,अनिल निलुलकर,रवि थिटे,रोहीत कांबळे,किशोर साळुंखे तुकाराम डुबेकर ,दिलीप घोकक्षे व सहभागी झाले .

See also  निर्मल, हरित आणि आनंददायी पालखी सोहळ्यासाठी नियोजन करा- विभागीय आयुक्त सौरभ राव