राज्यभर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे घंटानाद आंदोलन ; प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांची माहिती

पुणे : भाजप प्रणित महाराष्ट्र सरकारने राज्यात अक्षरशः शिक्षणाचा खेळ खंडोबा केला आहे. सरकारने दोन वर्षांपासून शिक्षण क्षेत्राशी निगडित घेतलेले असंख्य निर्णय हे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवत आहेत.
हे सरकार बदलल्या शिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी संपणार नाहीत. असे आवाहन करत उद्या राज्यभर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या विविध निर्णयामुळे राज्यात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड होऊन बसले आहे. हे सरकार बदलले नाही तर राज्यातील विद्यार्थी देशोधडीला लागतील. म्हणून शिक्षण वाचवण्यासाठी हे सरकार बदलणे आवश्यक आहे. यासाठी एक घंटानात आंदोलन करण्यात येत आहे अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार, महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी दिली.

See also  विभागांनी समन्वयांने काम करत मानीव अभिहस्तांतरणाच्या विशेष मोहिमेला गती द्यावी- अपर जिल्हाधिकारी अजय मोरे