संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

हिवरे  :  हिवरे (ता.शिरुर) येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला, सालाबादप्रमाणे संत सावतामाळी युवा प्रतिष्ठाण आयोजित या वर्षी देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ह.भ.प.नवनाथ महाराज माशेरे यांचे सुश्राव्य असे किर्तन पार पडले. या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्त सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजक व युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष विकास गायकवाड,सरपंच दिपाली खैरे,मा.सरपंच शारदा गायकवाड,युवासेना उपजिल्हाप्रमुख तथा युवा प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष रेवणनाथ गायकवाड,मा.सरपंच श्री विकास शिर्के,ऋतुध्वज सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष श्री हेरंब नगरे,मा.उपसरपंच श्री विश्वनाथ शिर्के,आबासाहेब तांबे,मा.चेअरमन श्री.संतोष गायकवाड,संचालक मच्छिंद्र गायकवाड,खजिनदार भाऊसाहेब गायकवाड आदी मान्यवर व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते,सुत्रसंचालन विकास शिर्के व आभार गणेश गायकवाड यांनी मानले.

See also  सांगवी येथील नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील निवृत्त प्राचार्य अशोक संकपाळ व नवीन प्राचार्य शरद ढोरे यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार