बालेवाडी येथे पिस्तूल व जिवंत काढतोस बाळगणाऱ्यावर बाणेर पोलीस स्टेशन अंतर्गत सापळा रचून कारवाई

बलेवाडी : बालेवाडी येथे बेकायदेशीर रित्या पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्याला  पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेत कारवाई केली.

बालेवाडी येथे रविराज ऑटो समोरील मोबाईल दुकानासमोर आरोपी सिद्धेश्वर दिगंबर ढेरे, वय 32, राहणार क्रियांश बिल्डिंग फ्लॅट नंबर 303 पाटील वस्ती बालेवाडी येथे पिस्टल व जिवंत काडतूस घेऊन चार चाकी गाडीतून आला असल्याची माहिती खबर्याद्वारे पोलिसांना मिळाली. यावेळी बाणेर हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असलेले पोलीस अंमलदार अतुल इंगळे व प्रदीप खरात यांनी आरोपी कडे पिस्तूल व जिवंत काडतुस असल्याची माहिती वरिष्ठांना कळवली. यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक डाबेराव यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता एक्सयूव्ही एम एच 14 डीसी 95 95 या गाडीमध्ये पिस्तूल व एक जिवंत काडतुस आढळून आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत व बाणेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांनी आरोपीला ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास बाणेर पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात येत आहे.

See also  निवडणूक कामकाजाकरीता नियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न