डॉ. दिलीप भाऊ मुरकुटे पाटील मित्र परिवार युवा मंच आयोजित सरंजाम वाटप कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

म्हाळुंगे :डॉ. दिलीप भाऊ मुरकुटे पाटील मित्र परिवार युवा मंच यांच्यावतीने बाणेर, बालेवाडी, सुस,म्हाळुंगे दीपावली सरंजाम वाटप आणि स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथ मुलांना दिवाळी फराळ वाटप महाळुंगे येथे खासदार संजय उर्फ बंडूभाऊ जाधव (बॉस/शिवसेना उपनेते) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी प्रास्ताविक करताना डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांनी सांगितले की, दिवाळीचा आपण सण सर्वजण मोठया उत्साहात साजरा करत असतो. परिसरातील नागरिकांची देखिल दिवाळी गोड व्हावी म्हणून हा सरंजाम वाटप आपण करतो. नागरिकांचे प्रेम आणि आशिर्वाद नेहमी पाठीशी असतात म्हणून समाजाप्रती सेवा देणारे कार्यक्रम असेच राबवत असतो.

जगामध्ये श्रीमंत माणसांची कमी नाही. परंतु दिलीप मुरकुटे यांच्या सारखी मनाची श्रीमंती असणारी माणसे कमी भेटतात. नागरिकांची सतत वेगवेगळ्या उपक्रमातून सेवा करण्याचे काम ते करतात त्यामुळेच नागरिकांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळतो : खासदार संजय उर्फ बंडूभाऊ जाधव (बॉस/शिवसेना उपनेते उ.बा.ठा.)

म्हाळुंगे येथील विजय लाढाणे यांचा थ्रो बल खेळात अशियन चॅम्पियनशिप मध्ये द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी समाजसेविका ममताताई सिंधुताई सपकाळ, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, बाळासाहेब भांडे (सदस्य लहुजी वस्ताद साळवे महामंडळ, राज्यमंत्री दर्जा), सामाजिक कार्यकर्त्या युगंधरा मुरकुटे, जयश्री मुरकुटे, कुसुमताई कांबळे, कल्पना बाधाडे, अंजली गायकवाड, उद्योजक शिवाजी चिवे, संतोष मोहोळ (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), मा. सरपंच नामदेव गोलांडे, रखमाजी पाडाळे, मयूर भांडे (युवासेना उपशहर प्रमुख शिवसेना उ. बा. ठा.), किरण मुरकुटे, ओम बांगर, किसनराव बालवडकर, जंगल रणवरे, जीवन चाकणकर, अर्जुन शिंदे, राजेश विधाते, अर्जुन ननवरे, वसंत चांदेरे, मेहबूब शेख, शाम बालवडकर, अतूल अवचट, हिरामण तापकीर, भानुदास पाडाळे, सोमनाथ कोळेकर, राजू शेडगे, संजय ताम्हाणे, राम गायकवाड, ॲड. विशाल पवार, रितेश बाधाडे, संतोष भोसले, शिवा नाईकवाडे, अविनाश गायकवाड आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

See also  मुंबई पुण्यासह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्यावे-आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या सूचना ;पुनर्रचित कोविड टास्क फोर्सची बैठक