खडकवासल्यात  उमेदवारी बाबत महाविकास आघाडीत नाराजी, इच्छुक अपक्ष लढण्याच्या तयारीत

खडकवासला : महाविकास आघाडीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करून खडकवासला विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी असलेला सस्पेन्स संपुष्टात आला असला तरी आघाडीतीलच इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या उमेदवारावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अपक्ष किंवा कसे निवडणुकीच्या रिंगणात उतरता येईल यासाठी जनमत आजमावण्यास सुरुवात केली आहे. यासाठी निष्ठावंतांचा मेळावा घेण्यात आला.


सन 2009 च्या विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत  शिवसेनेच्या  हातून निसटलेला खडकवासला मतदारसंघ दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या रूपाने मनसेला मिळाला. त्यांच्या निधनानंतर भाजपकडे हा मतदारसंघ गेला असे असले तरी मागील तीनही निवडणुकीत भाजपचे प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेले मतदानातील फरक हा कमी असल्याचे सांगत या मतदारसंघावर महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाला. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सामील झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. या फुटीचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. अजित दादांनी लोकसभेच्या उमेदवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा मिळावा आणि त्यांचा प्रचार करावा म्हणून मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून फोन करून सांगितले. तरीही निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागे उभे राहिले. त्यांना निवडून  निवडून आणण्यासाठी  कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उघड उघड नाराजी पत्करली होती.


त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांपैकी उमेदवार असलेले सचिन दोडके, काका चव्हाण, नवनाथ पारगे, बाळा धनकवडे यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली. 2019 च्या निवडणुकीमध्ये अवघ्या अडीच हजार मतांच्या फरकाने सचिन दोडके यांचा निसटता पराभव झाला होता. त्यामुळे आत्ताच्या म्हणजे 2024 च्या निवडणुकीमध्ये नवीन उमेदवाराला संधी द्यावी असे पक्षश्रेष्ठींकडे इच्छुक उमेदवारांनी आपले मत व्यक्त केले होते परंतु पक्षश्रेष्ठींनी विविध सर्वे करून आपण सचिन दोडके यांना उमेदवारी दिली आहे असे इच्छुकांना सांगितले. हे इच्छुकांना  पटले नाही. त्यामुळे या नाराज  उमेदवारांपैकी दत्ता धनकवडे आणि  नवनाथ पारगे यांनी मतदारसंघात मेळावा घेऊन जनमत आजमावण्याचा आणि उमेदवारीसाठी काय करता येईल यासाठी विचारविनिमय केला या मेळाव्यांमध्ये मतदार संघातील विविध कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना आपला पाठिंबाही दर्शविला आहे.

See also  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अध्यक्षपदाची धुरा पुन्हा शरद पवार यांनी स्वीकारली


मेळाव्यास गोगलवाडीचे सरपंच अशोक  गोगावले,  आगळंबेचे उपसरपंच अतुल पारगे,सोमनाथ  कंक, सुधाकर गायकवाड पांडुरंग सुपेकर  योगेश भामे,जितेंद्र  कोंडे, बाळासाहेब चव्हाण, संतोष पायगुडे, यप्रे महाराज, देवेंद्र महाराज निढाळकर यांच्यासह शिवगंगा खोरे, खानापूर, बहुली, आगळंबे, खडकवासला, धनकवडी, वारजे, भुसारी कॉलनी, वडगाव, धायरी या गांवांसह मतदारसंघातील विविध भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताईंनी घात केला
लोकसभेच्या निवडणुकीतील खासदार सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळावे यासाठी जनसंपर्क आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याची किमया ताईंनी अनुभवली. त्याचदरम्यान  ताईंनी येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करण्यासाठी सुचविले होते. या विश्वासातूनच सर्व मतदार संघ पिंजून काढला. पक्षश्रेष्ठींबरोबर झालेल्या मुलाखतीतही जुनाच उमेदवार देणे ऐवजी नवीन उमेदवाराला संधी द्या अशी सुचवले होते. पक्षाची पहिली यादी जाहीर होताना इच्छुकांनी जुन्याच उमेदवाराच्या नावावर उघड नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती. असे इच्छुक उमेदवार नवनाथ पारगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.