पुणे,ता.२७: “समाजात व्यक्ती गेल्यावर होर्डिंग लावली जातत, वेगवेगल्या प्रकारचे उपक्रम घेतले जातत. बराचसा पैसा वेगवेगळ्या कारणाने खर्च केला जातो, मात्र निम्हण कुटुंबियांनी वेगळेपण जपत समाजातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना आंधारातून ऊजेडाकडे घेऊन जाणारा उपक्रम राबविला आहे. माणसं आपलं दु:खं कुरवाळत बसतात पण आपल्या दु:खाबरोबर समाजाची जाणीव असणारी माणसं खूप कमी आहेत. म्हणून हा निम्हण कुटुंबियांचा वेगळेपणा आहे.” असे मत प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांनी व्यक्त केले.दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शनिवार (ता.२६) बालगंधर्व रंगमंदीर येथे सोमेश्वर फाऊंडेशन तर्फे गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना ‘विनायकी’, ‘विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ वाटप कार्यक्रमात प्राचार्य जाधव बोलत होते. यावेळी पद्मभूषण शां.ब मुजूमदार, प्राचार्य भाऊसाहेब जाधव, प्राचार्य दिलीप ओक यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना ‘शिष्यवृत्ती’चे वाटप करण्यात आले.
पद्मभूषण शां.ब मुजूमदार म्हणाले, ” मुलं हुशार असतात, प्रथमिक, माध्यमिक वर्गामध्ये पहिले, दूसरे, तीसरे असतात. पण दुरदैवाने ते उच्च महाविद्यालयात जाऊ शकत नाहीत. ह्याचं कारण? त्यांना मिळालेला दारिद्र आणि गरिबीचा श्याप. तो लागू नये म्हणून, निम्हण यांनी हा प्रयोग चालू केला. भारतामध्ये व्यक्ती, राज्य देशाचा विकास होयचा असेल तर शिक्षणाला पर्याय नाही. शिक्षण असं औषध आहे ते अनेक रोगांवरती लागू पडतं हेच निम्हण यांनी स्विकारलं.”
प्राचार्य दिलीप ओक म्हणाले, ” राजकारण आणि शिक्षणाचा फारसा सबंध नसतो, असे मी आत्तापर्यंत बघितले आहे. मात्र निम्हण कुटुंबिय हे वेगळेच कुटुंब आहे. हे वेगळे राजकारणी आहेत लोकांना आरोग्य, शिक्षणासाठी पैसे देतात.”
प्रस्ताविक करताना सनी निम्हण म्हणाले, “सोमेश्वर फाऊंडेशच्या माध्यमातून वर्षभर सामाजिक उपक्रम राबवले जातात. हे उपक्रम घेत असताना सर्वसमान्य घटकांना पुढं जायचं असेल तर त्यांची आर्थिक ओढातान होऊ नये अशी आमची भावना होती. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावावा त्यातून चांगला समाज घडवा हा उद्देश ठेवून या वर्षी देखील ५२९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.”
यावेळी माजी महापौर दत्ता गायकवाड, माजी नगरसेविका स्वाती विनायक निम्हण, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित मुरकुटे यांनी केले तर आभार उमेश वाघ यांनी मानले.
घर साहित्य/शैक्षणिक विद्यार्थ्यांना आंधारातून ऊजेडाकडे घेऊन जाणारा उपक्रम -प्राचार्य भाऊसाहेब जाधव ; सोमेश्वर फाऊंडेशन...