चंद्रकांत पाटील यांना बहुमताने विजयी करण्याचे आश्वासन अमोल बालवडकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले व दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या

कोथरूड : कोथरूड मतदार संघातील भाजपाचे इच्छुक उमेदवार अमोल बालवडकर यांचे बंड थांबवल्यानंतर या निवडणुकीमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचा मार्ग काहीसा सुखर मानला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाई नंतर अमोल बालवडकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर यांनी शुभेच्छा पर मुंबई येथे भेट घेतली.

संघटन हीच शक्ती आहे आणि भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांच्या कार्याचा योग्य वेळी योग्य तो सन्मान केल्या जाईल असे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संवाद साधताना सांगितले.

यावेळी अमोल बालवडकर यांनी बाणेर बालेवाडी पाषाण कोथरूड परिसरातील नागरिकांच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांना दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या व त्यांचा सत्कार केला.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोथरुड विधानसभा मतदारसंघ येथून चंद्रकांत दादा पाटील यांना बहुमताने निवडून येण्यासाठी अथक परिश्रम करण्याचा शब्द यावेळी अमोल बालवडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. यावेळी समित कदम, हेरंब शेळके, विक्रम विनोदे, सागर बालवडकर, विनोद बालवडकर, विक्रम साखरे आदी उपस्थित होते.

See also  जैन विचार मंचच्या वतीने 'आहार दिन' निमित्त 'ऊसाचे रसपान'