कोथरूड कर्वेनगर परिसरात चंद्रकांत मोकाटे यांना महिला भगिनींनी औक्षण करत भाऊबीज साजरी केली

कोथरूड : माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना भाऊबीज निमित्त कोथरूड व कर्वेनगर परिसरातील महिलांनी औक्षण व ओवाळणी करत भाऊबीज साजरी केली.

कोथरूड विधानसभा मतदार संघामधून महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना पक्षाचे उमेदवार माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रचाराच्या व्यस्त कार्यक्रमांमध्ये दिवाळी निमित्त विविध नागरिकांच्या भेटी घेण्यात येत आहेत. दरम्यान भाऊबीज निमित्त कोथरूड व कर्वेनगर परिसरातील महिला भगिनींनी चंद्रकांत मोकाटे यांना ओवाळणी करत भाऊबीज साजरी केली.

यावेळी कोथरूड परिसरातील भगिनींशी चंद्रकांत मोकाटे यांनी संवाद साधला.

See also  लाक्षणिक हेल्मेट दिवशी लक्षणीय प्रबोधन पुणेकरांकडून उपक्रमाची प्रशंसा