चंद्रकांतदादा पाटील यांचा कमिन्सच्या कर्मचाऱ्यांशी संवादाने प्रचाराचा समारोप

कोथरूड : प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चंद्रकांतदादा पाटील यांनी कमिन्सच्या कर्यचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कमिन्स कर्मचाऱ्यांनी चंद्रकांतदादा पाटील यांना जास्तीत जास्त मतदान करुन विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, सरचिटणीस विठ्ठल आण्णा बराटे, दीपक पवार, नवनाथ जाधव, राजाभाऊ बराटे, बाळासाहेब टेमकर, अमित तोरडमल, बाळासाहेब दांडेकर यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कामगार युनियनचे उपाध्यक्ष सुधीरबापू सरोदे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत चंद्रकांतदादा पाटील यांचे काम सर्वसमावेशक आहे. कोणतीही जात पंथ यांचा विचार न करता तुम्ही प्रत्येक घटकांसाठी काम केले आहे. त्यामुळे तुम्हाला विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करु, अशी कामगार युनियनच्या वतीने ग्वाही दिली.

See also  बारामतीमध्ये ‘ईएसआयसी’च्या २०० खाटांच्या रुग्णालयासाठी ‘एमआयडीसी’ मार्फत वाढीव जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश -उपमुख्यमंत्री अजित पवार