सुसगावात उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन, शिवसैनिक दिलीप मुरकुटे यांचा उपक्रम

सुसगाव: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुसगावात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांनी महाराष्ट्र भूषण, समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते, ज्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना, बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, राम गायकवाड शाखाध्यक्ष बाणेर नागरी पथसंस्था पिरंगुट,  रखमाजी पाडाळे, ॲड विशाल पवार, शिवसेना शाखाप्रमुख वसंत चांदेरे, सोमनाथ कोळेकर, माजी सरपंच नामदेव चांदेरे, जालिंदर चांदेरे, विष्णू फणसे, नंदकुमार फणसे, सचिन भोते, बद्रीनाथ भोते, मृदंगमनी सुरज फणसे, भैरवनाथ भजनी मंडळ सुसगाव, अविनाश गायकवाड, ऋषिकेश लोढे, जीवन खेडेकर, सुमित कांबळे, शिवकुमार नाईकवाडे, महिला भजनी मंडळ, सुसगाव ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन