बाणेर मधील सर्वे नंबर 288 मधील मंदिर श्री खंडोबा देवाचे 1967 च्या महसुली पुराव्यात आढळला उल्लेख

बाणेर : बाणेर येथील सर्वे नंबर 288 मधील हे मंदिर श्री खंडोबा देवाचे असल्याचे 1967 सालच्या महसुली दप्तरातील कागदपत्रानुसार समोर आले आहे.

बाणेर येथील कपिल मल्हार सोसायटी समोरील जागेमध्ये असलेले पुरातन मंदिर हे कोणत्या देवाचे आहे याबाबत गेले अनेक वर्ष विविध प्रकारचे माहिती दिली जात होती. तर काही नागरिकांच्या माध्यमातून हे मंदिर भैरवनाथाचे पादुका मंदिर असल्याचे सांगितले जात होते. परंतु 1967 सालीच्या खरेदी खतातील महसुली दप्तरांमध्ये या मंदिराबाबत खंडोबाचे लहान देऊळ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

यामुळे गेले अनेक वर्ष हे मंदिर नक्की कोणत्या देवाचे याबाबत असलेल्या प्रश्नचिन्हाचे उत्तर या निमित्ताने समोर आले आहे. मुरकुटे परिवारातील सदस्यांच्या श्री खंडोबा वरील भक्ती अथवा नवसामुळे या छोटेखानी मंदिराची खाजगी जागेत उभारणी करण्यात आली असावी.

बाणेरच्या कपिल मल्हार सोसायटी जवळील जागेमध्ये दगडी चौथर्‍यावर हे छोटेखानी मंदिर उभारण्यात आले आहे. परंतु हे मंदिर कोणत्या देवाचे होते याबाबत मात्र अद्याप पर्यंत संभ्रम होता. सध्या या मंदिरा समोर श्री भैरवनाथ पादुका मंदिर असा फलक लावण्यात आला आहे. परंतु हे मंदिर श्री खंडोबा देवाचे असल्याचे पुरावे आढळून आले आहेत. यामुळे हे मंदिर श्री खंडोबा देवाचे असून याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आणखी शोध घेतला जात आहे.

See also  ऐश्वर्य कट्ट्यावर उलगडले धगधगते सामाजिक वास्तव