बाणेर : जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि ब्ल्यू ब्रिगेड यांच्या वतीने बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण आणि परिसरातील सर्व नागरिकांसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धा फॅमिली रन ३.० चे 22 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
या फॅमिली रन मध्ये तीन,पाच व दहा किलोमीटर रन असणार असून पाच लकी ड्रॉ विजेत्यांना सायकल तसेच अनेक आकर्षक बक्षीस ठेवण्यात आली आहेत.
चला बदलाचे साक्षीदार होऊया.. निरोगी आयुष्य जगूया पर्यावरणाचे संरक्षण करूया असा संदेश या मॅरेथॉन मधून देण्यात येणार आहे. बाणेर बालेवाडी पाषाण औंध सुस महाळुंगे परिसरातील नागरिकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी केले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन फी : ₹100 असून प्रत्येक स्पर्धकाला टी-शर्ट, बिब, फिनिशर मेडल, सर्टिफिकेट, झुंबा, योगा कुलडाऊन, ब्रेकफास्ट, एनर्जी ड्रिंक दिले जाणार आहे.
ठिकाण: माऊली पेट्रोलियम जवळील ग्राउंड, बाणेर रोड, बाणेर, पुणे. दिनांक : 22 डिसेंबर 2024
वेळ : सकाळी 6 वाजता
अधिक माहितीसाठी संपर्क :
जयेश मुरकुटे : 7709775034
अजय देसाई : 9766353337