ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूनंतर अखेर प्रशासनाला जागा औंध येथील नागरस रस्त्यावरील रस्ते दुरुस्ती व चौकातील रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू

औंध : औंध नागरस रोड येथे बुधवारी औंध येथील रहिवासी जगन्नाथ काशिनाथ काळे यांचा पुणे महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे अपघात होऊन मृत्यू झाल्यानंतर पुणे महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले यानंतर मेडिपॉइंट हॉस्पिटल जवळील चौकातील कुमार प्रेरणा येथील रस्ता रुंदीकरणाचे काम तसेच वाहतूक मार्गातील अडथळे दूर करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच औंध येथील वाहतूक कोंडीच्या प्रश्नाबाबत तसेच औंध बाणेर परिसरातील रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात विधाते वस्ती येथे वाहतूक पोलीस आयुक्त तसेच पुणे महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या सोबत बैठक घेण्यात आली होती. यानंतर नागराज रस्त्यावर बुधवारी काँक्रीट रस्ता व ब्लॉक त्यामध्ये असलेला रस्त्यातील उंच सखल भाग यामुळे ज्येष्ठ नागरिकाची गाडी घसरून रस्त्यावर पडल्यानंतर त्यांच्या डोक्यावरून चार चाकी गाडीचे चाक गेले व या अपघातात त्यांना आपला जीव गमावा लागला.

याबाबत औंध परिसरामध्ये संतापाची लाट निर्माण झाले असेल रस्त्यांमधील खड्डे व नागरिकांच्या सुरक्षा संदर्भात असलेला प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. औंध बाणेर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  शिवाजीनगर बसस्थानक म्हणजे पुणेकरांसाठी चकवा!