बालेवाडी : बालेवाडी येथील कुणाल अस्पायरी सोसायटी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा, पालखी शोभा यात्रा, सोसायटी चे ढोल पथक आणि लहान मुलांचे लेझीम पथक विशेष आकर्षण होते. कोल्हापूरहून आलेले लेझीम पथक पाहून सगळ्यांचे डोळ्याचे पारणे फिटले. बालेवाडीतील या सोसायटी मध्ये शिवजयंती उत्साहात आणि परंपरेने साजरी केली जाते अशी माहिती सोसायटी सदस्या शुभांगी सावंत यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवजयंती निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये सोसायटी मधील मुले महिला व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता.