बालेवाडी येथील मुक्ताईनगर पाणी समस्या सोडवण्याच्या माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

बालेवाडी : बालेवाडी येथील मुक्ताई नगर भागामध्ये असलेल्या पाणी समस्येवर तातडीने उपाययोजना करुन पुणे मनपा पाणी पुरवठा अभियंता तसेच L&T चे सर्व अभियंता यांच्या समवेत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी जागेवर जाऊन पाहणी केली.

यावेळी तातडीने नवीन पाईपलाईन टाकुन या परिसरातील पाणी समस्या येत्या ५ दिवसात सोडविण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना अमोल बालवडकर यांनी दिल्या. यावेळी  पाणी पुरवठा विभागाचे अभियंता अनुप गजेलवार, L&T चे अभियंता मनोच चव्हाण, सचिन नायक, पथ विभाग अभियंता योगिता भामरे व परिसरातील महिला भगिनी उपस्थित होत्या.

See also  बाणेर येथील ज्ञानेश्वर बाळाजी मुरकुटे पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला