सी 1 ईस्टर्न मिडोज, खराडी येथे सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

पुणे : वाढत्या वीजबिलांच्या समस्येवर उपाय म्हणून ईस्टर्न मिलोज, खराडी येथील सोसायटीने मोठा निर्णय घेत सौरऊर्जा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला सोसायटीतील महिला गिता घुले,वर्षा पवार, प्रियांका चोपडा व मंजूषा शिंदे याच्यां हस्ते उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक, महिला व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या प्रकल्पामुळे सोसायटीला मोठ्या प्रमाणात वीज बचत होणार असून, भविष्यातील विजेच्या वाढत्या दरांपासून संरक्षण मिळेल. सोसायटीचे अध्यक्ष विश्वनाथ घुले यांनी सांगितले की, “ही योजना सोसायटीच्या हितासाठी असून, इतर सोसायट्यांनीही असा पर्यावरणपूरक उपक्रम हाती घ्यावा.”

सोसायटीच्या सदस्यांनी सखोल चर्चा व पथक निरीक्षणानंतर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्याचा निर्णय घेतला. यामुळे केवळ वीज बचतच नव्हे, तर हरित ऊर्जेचा वापर वाढवण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे सोसायटीतील निवासींना दीर्घकालीन आर्थिक लाभ मिळेल, तसेच पर्यावरण रक्षणास हातभार लागेल.

या उद्घाटन प्रसंगी सोसायटीचे सदस्य मोरेश्वर उदावंत,आनंद शिंदे, रणजीत पवार, राम वर्मा, अनिल पंडित, प्रितेश चोपडा व अजित प्रसाद यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. सोसायटीच्या वतीने हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या सर्व सभासदांचे आभार मानण्यात आले.सौरऊर्जा ही काळाची गरज असून, अशा पुढाकारांमुळे शाश्वत विकासास चालना मिळेल, असा विश्वास सोसायटीच्या सदस्यांनी व्यक्त केला.

See also  महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचा कर्वेनगर व दुधाने वस्तीमध्ये पदयात्रेद्वारे प्रचार