मुख्यमंत्र्यांनी कोरटकर प्रमाणे आर एस एस चे भैय्याजी जोशी चिल्लर असल्याचे जाहीर करावं -उद्धव ठाकरे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी ‘घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही.’ असे वक्तव्य एका भाषणादरम्यान केल्याने विरोधकांसह राज्याच्या नागरिकांमध्ये देखील संताप व्यक्त केला जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांचा उल्लेख अनाजी पंत असा करत कोरटकरप्रमाणे जोशी चिल्लर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी  ‘घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही.’ अस वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समचार घेतला. यावेळी ठाकरेंनी भैय्याजी जोशी यांचा उल्लेख अनाजी पंत असा केला.

उद्धव ठाकरे म्हणाले,  ‘भैय्याजी जोशी यांनी काल विधान केलं आणि गोमूत्र म्हणायचे की काय ते शिंपडून गेले. छत्रपती शिवाजी पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत, संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत.असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की मराठीवूरन विष कालवून गेले आहेत. पहिल्यांदा बटेंगे तो कटेंगे म्हणत होते आता मराठा आणि मराठेतर वाटणी करायची आणि राज्य करायचे असा यांचा डाव असल्याचा आरोप सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी हे वक्तव्य तमिळनाडूमध्ये अहमदाबादमध्ये बोलून दाखवावं आणि सुखरूप बाहेर येऊन दाखवावं.

तसेच ते पुढे म्हणाले की, मराठी माणूस मत देणार, तो जातो कुठे असा त्यांना प्रश्न पडतोय का अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली भाषावार प्रांत झाले असताना आता गल्लीवर प्रांत करत आहेत का अशी विचारणा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली. दरम्यान, प्रशांत कोरटकर मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिल्लर असल्याचं म्हटलं होतं. तोच संदर्भ पकडत भैय्याजी चिल्लर माणूस आहे हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून दाखवावं असा आव्हान त्यांनी दिले. मराठी भाषा नाही आली तरी चालेल म्हणणाऱ्यांवर कारवाई करून दाखवावी असे ते म्हणाले. नाही तर भाजप आणि संघाचा छुपा अंजेडा असल्याचा मान्य करावे असा टोला त्यांनी लगावला.

See also  पै.शिवराज अनिल बालवडकर यांने रशिया येथील स्पर्धेत ब्रांझ पदक पटकावल्या बद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार