बावधन गावची गायरानाची जमीन गावाच्या विकासासाठी मिळावी माजी नगरसेवक किरण दगडे यांचे महसूल मंत्री बावनकुळे यांना निवेदन

बावधन : बावधन गावची जमीन मिळावी गावच्या विकासासाठी मिळावी यासाठी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना माजी नगरसेवक किरण दगडे व अभिनेते प्रवीण तरडे यांनी निवेदन दिले. किरण दगडे यांच्या बावधन येथील जनसेवा कार्यालयास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी गावाच्या विकासा संदर्भातील महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. 

मौजे बावधन बुद्रुक, ता. मुळशी, जि. पुणे येथील सरकारी गायरान मिळकत स.न.२३ मधील बराचसा भाग विविध संस्थांना वाटप करण्यात आला आहे. मात्र आजपर्यंत तो विकसित झालेला नाही. या संदर्भात, त्या जमिनीचा गावाच्या विकासासाठी पुनर्विचार व्हावा, ते क्षेत्र स्थानिक रहिवाशांच्या हितासाठी परत मिळावे, उर्वरित जागेचे भविष्यात वाटप होऊ नये, याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या जमिनीवर नाट्यगृह, क्रीडा संकुल आणि उद्यान निर्मिती बाबत प्रमुख मागणी केली.  या विशेष बैठकीस आमदार विक्रांत पाटील , प्रदेश सरचिटणीस भाजपा राजेश पांडे ,मुळशी पॅटर्न चित्रपटाचे दिग्दर्शक व सुप्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, माजी नगरसेविका डॉ श्रद्धाताई प्रभुणे -पाठक,अल्पनाताई वरपे ,माजी सरपंच राहुल दुधाळे यांची देखील उपस्थिती होती. 

See also  महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या नूतनीकृत कार्यालयाचे उदघाटन