महिलांचे नेतृत्व देखील आता समाजाला मार्गदर्शक ठरेल : बाळासाहेब भांडे; जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार

पुणे : समाजातील महिलांना विकासाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या असून त्यांनी आता त्यांचा विस्तार ध्यानात घ्यावा. स्व- विकासाबरोबरच कुटुंब आणि गरजू घटकांना विकास प्रवाहात आणण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यांच्यातील नेतृत्व देखील आता समाजाला मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन बहुजन विचार साहित्य परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब भांडे यांनी येथे केले. निमित्त होते बहुजन विचार साहित्य परिषद, साहित्य संस्कृती मंडळ आणि अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलनाचे.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली अशा महिलांचा जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आज जाहीर सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी अण्णाभाऊ साठे विचार विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. विचारवंत बबन पोतदार आणि प्रा. माणिक सोनवणे यांनी विचारधारा मांडली. सामान्य नागरिक ते उद्योजक असा प्रवास करणारे व्यक्तिमत्त्व बाळासाहेब भांडे यांची प्रकट मुलाखत यावेळी घेण्यात आली. त्यांच्या उत्कंठावर्धक जीवन प्रवासाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. यावेळी निमंत्रित कवींनी कविता सादर केल्या.

साहित्यिक सोपान खुडे, समाज विकास तज्ञ नंदकिशोर लोंढे, आयोजक अस्मिता जोगदंड – चांदणे, अविनाश सप्रे, विनोद कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.अर्चना सैद यांनी सूत्र संचालन केले.

See also  दिल्ली पब्लिक स्कूल, हिंजवाडी येथे 76 वा प्रजासत्ताक दिन प्रेरणादायक संदेश आणि सादरीकरणांसह साजरा