औंध : नाशिक मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या (एस. टी.)बसेसला बोपोडी येथे पूर्ववत थांबा सुरू करावा, अशी विनंती आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी केली. या मागणीचे निवेदन त्यांनी रा. प. पुणे विभाग नियंत्रक, अरूण सिया यांना दिले.
त्यांनी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, नाशिक मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसेस स्वारगेट, शिवाजीनगर, वाकडेवाडी, बोपोडी, दापोडी मार्गे पुढे मार्गस्थ होतात. या गाड्या पूर्वी बोपोडी येथे थांबत होत्या. गेल्या काही दिवसांपासून हा थांबा एस. टी महामंडळाकडून बंद करण्यात आला आहे.
यामुळे खडकी,बोपोडी, औंधरोड, चिखलवाडी या भागातील लोकांना या नशिक ते पुणे मार्गावर प्रवास करताना एस. टी साठी स्वारगेट अथवा वाकडेवाडी येथे जावे लागते. या भागातील अनेक लोक चाकण अथवा नाशिक मार्गावर प्रवास करतात. त्यांची गैरसोय होते त्यामुळे पुण्यात तसेच नाशिककडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर पुणे विभागातील सर्व एस. टी बसेसना बोपोडी येथे पूर्ववत थांबा करावा अशी विनंती सुनील माने यांनी या पत्राद्वारे केली आहे.