पिरंगुट : मुठा खोऱ्यातील मुठा ते लवासा रोडची अवस्था बिकट पाण्याचे डबक्या मुळे रोडच दिसत नाही या विभागात बरेच ठिकाणी रोडवर पाणी साठून पाण्याची डबकी तयार झाली आहे तसेच ठिकठिकाणी खड्डे देखील पडले आहे त्यामुळे दुचाकी स्वार यांना मोठा अडचणीचा प्रवास करताना होत आहे.
तसेच रात्रीचा वेळेस रोडवर पथदिवे नसल्यामुळे अपघात देखील होऊन यातून मोठी दुर्घटना देखील होऊ शकते. सदर रोडला चार कोटी खर्च करून रोडची ही अवस्था आहे. पावसाळ्या पूर्वी व त्यानंतर ही बांधकाम विभागाने रोडचा बाजूने बांधकाम विभागाने पाणी जाण्यासाठी कुठले ही नियोजन केले नाही त्यामुळे पाणी रोडवर येत असून रोडवर खड्डे पडत आहेत.
याचा जाहीर निषेध नोंदवत युवा सेनेच्यावतीने रस्त्यात झाड लावुन आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी युवासेनेचे उपजिल्हाअधिकारी अमित कुंडले, विभाग अधिकारी आकाश भरेकर, ग्रामपंचायत सदस्य खंडू उभे यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे या विभागात मोठा प्रमाणात पर्यटक येत असतात तरही या रोडकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे रोडची अवस्था दयनीय झाली आहे.