रस्त्यांवर अनधिकृत आठवडे बाजार सुरूच ; कारवाईसाठी मनपा आयुक्तांनीच अतिक्रमण विभागाचा कारभार हातात घ्यावा

औंध : औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या रस्त्यांवर भरणाऱ्या अनाधिकृत आठवडे बाजारांवर पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग अंतर्गत ठोस कारवाई होत नसल्याने राजकीय कार्यकर्त्यांचे फोटो लावून बिनधास्तपणे रस्त्यावरच आठवडे बाजार भरवले जात आहेत. आम्हाला अधिकृत आठवडे बाजारांवर कारवाई करताना प्रशासनाची झालेली केविलवाणी अवस्था ‌ यामुळे   पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनीच अतिक्रमण विभागाचा कारभार हातात घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

औंध क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत 36 पैकी 9 अधिकृतपणे परवानगी दिलेले आठवडे बाजार आहेत उर्वरित आठवडे बाजार हे पुणे महानगरपालिकेच्या रस्त्यांवर अनधिकृतपणे भरवले जात आहेत. यातील बहुतांश आठवडे बाजार हे राजकीय कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने रस्त्यांवरच भरवले जात असल्याने यावर प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे.

वाहतुकीला अडथळा असून देखील तुझ्यावर पुणे महानगरपालिका प्रशासन व वाहतूक पोलीस विभाग कोणतीच कारवाई करत नसल्याने प्रशासनाचे हात कारवाई न करण्यासाठी नक्की कोणी बांधले आहेत याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून आठवडे बाजार रस्त्यावरच भरवले जात आहेत. यामुळे रस्त्यावर कोणीही व्यवसाय बिंदास्तपणे करावा असा एक प्रकारे संदेश प्रशासनाच्या कारवाई न करण्यामुळे नकळतपणे दिला जात आहे.

अतिक्रमण विभागाच्या वतीने अनाधिकृत आठवडे बाजार रहदारीच्या रस्त्यांवर भरवणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी तसेच यासाठी विशेष पथक करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

See also  नागरीकांनी काळजी घ्यावी; आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सज्ज रहावे – उपमुख्यमंत्री अजित पवार ; पुणे शहर परिसरात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली प्रशासनाकडून माहिती