एकता महिला ग्रुपच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान आणि महिलांचा सत्कार

हडपसर : एकता महिला ग्रुपच्या वतीने महिला दिनानिमित्त कंडक्टर, रिक्षा चालक, वकील, डॉक्टर,शिक्षक,इंजिनिअर, सोशल वर्कर, बिजनेस महिला, गृहिणी पोलीस यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यामुळे प्रमुख पाहुणे पुणे आरटीओ च्या पोलीस अधिकारी भाग्यश्री आबाजी पाटील उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते  महिलेचा सन्मान करण्यात आला. एकता महिला ग्रुप फॉउंडर वैशाली अतुल वाडकर आणि संध्या संतोष शेडगे या हा उपक्रम गेली 4 वर्ष राबवित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ, मै मेरी झाशी कभी नही दूंगी असे ठमकावून इंग्रजांशी संघर्ष करणारी राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणाची महती ओळखून मुलींना स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्रियांच्या कार्याला वंदन करून या महिलांचा सन्मान सोहळा सुरू करण्यात आला.

यावेळी कविता चांदणे,तृप्ती बेरी, पंचशीला कदम, ऍडव्होकेट,उलका पाटिल,शोभा साळवे,रजनी पलवेनचा,
दीपा गिरगुणे,प्रिया कांदाळगावकर, संध्या पवार, राणी बनकर
नेत्रा नागपुरे,शामल मोरे, राजश्री नाले, रेखा धुमाळ, सोनल जगताप, शीतल ढोरे,योगिता हरपळे, अश्विनी देवगुणे,रोहिणी ठोंबरे, प्रिया बगाडे, स्नेहल काळे,कलावती सोनकांबळे, विनिता लाटे, रेखा जाधव,सरला गायकवाड , अनिता गायकवाड,राणी जाधव, लता गायकवाड, डॉ,मानसी कुलकर्णी,दीपा हुक्केरी,
मंजुषा अल्लाम,सविता येवारे, प्राजक्ता औटी,पूजा गयावल
माधुरी बराटे आधी महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

See also  आळंदी वारकऱ्यांवर पोलिसांकडून सौम्य लाठीमार ; घटनेचा विविध स्तरातून निषेध