राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी श्रीकांत पाटील यांची नियुक्ती

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील यांच्या आदेशाने श्रीकांत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष स्थापनेपासून श्रीकांत पाटील हे राष्ट्रवादी पक्षामध्ये कार्यरत आहेत. पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले असून औंध क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत विविध विकास कामांच्या माध्यमातून त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.

See also  नृत्य गुरु रोहिणी भाटे नृत्य महोत्सवातील कलाविष्कराने कोथरुडकरांची जिंकली मने!