बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन

बालेवाडी : बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन रमझान महिन्यात केले जाते. यावर्षी बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, बाणेर वाहतूक  पोलीस निरीक्षक पठाण, त्यांचे सहकारी, सर्व पत्रकार बंधु आणि बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे सदस्य यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विकास कामत, शकिल सलाती, यश चौधरी, रमेश रोकडे, दफेदार सिंह, मोरेश्वर बालवडकर, वैभव आढाव, ॲड. माशाळकर, ॲड. इंद्रजित कुलकर्णी, शुभांगी इंगवले, योगेंद्र सिंग, आशिष कोटमकर, डॉ. सुधीर निखारे, ओमप्रकाश वानखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

See also  लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ…आपल्या औंध बोपोडीला विकासात अग्रेसर ठेऊ - नवनिर्वाचित नगरसेवक सनी निम्हण यांनी घेतली विरोधकांची भेट