औंध येथे 370 गडदुर्ग व क्रांतिकारक देशभक्त व धर्म स्थळावरील मातीच्या कलशाचे पूजन

औंध : अक्षय तृतीये निमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मेघडंबरी औंधगाव येथे पद्मश्री श्री गिरीष प्रभुणे , श्री संजय गायकवाड, श्री रामदास सूर्यवंशी बारा बलुतेदार विकास संघ अध्यक्ष या मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजाना पुष्पहार अर्पण केला ज्येष्ठ स्वयंसेवक श्री प्रकाशजी नाईक यांच्या हस्ते किल्ल्यांच्या मातीचे पुजन करण्यात आले सर्व मान्यवर व उपस्थित माता भगिनीच्या हस्ते दीप प्रज्वलन केले आणि भारतमातेचे पुजन केले.


गणेश ( आबा ) कलापुरे यांनी प्रस्तावना केली वक्त्यांचा परिचय करून दिला.पद्मशी गिरीष प्रभुणे यांनी वेद काळ ते आजपर्यँत भारतात असणारी सामाजिक समरसता आपली संस्कृती आणि त्यावर होणारे पश्चात्य विचारांचे आक्रमण समाज म्हणुन आपली भूमिका कुटुंब प्रबोधन अशा अनेक विषयांवर प्रबोधन केले.

370 गडदुर्ग , संत तुकाराम महाराज देहू  ,चंद्रशेखर आझाद आश्रम ,राणी लक्ष्मीबाई झाशी किल्ला रामाधी , संग्राम दुर्ग चाकण स्थान, स्वातंत्र्यविर सावरकर जन्मस्थान भगूर ,पेमगिरी किल्ला शहाजी राजे, तलवंडी गुरुद्वारा तख्त दमदमा साहेब पंजाब , श्री संताजी जगनाडे सुदुंबरे , काळाराम मंदिर नाशिक ,  प्रयागराज संगम गंगा , अक्कलकोट स्वामी समर्थ वटवृक्ष , डी. आर. डी. ओ. “DRDO” , धर्मविर छत्रपती संभाजी महाराज समाधी वढू पुणे , महात्मा फुले वाडा पुणे,जेजुरी, खंडोबा पुणे , अहिल्यादेवी होळकर जन्मस्थान चौँडी , मातृतीर्थ लालमहाल पुणे ,श्री संत ज्ञानेश्वर क्षेत्र आळंदी पुणे , लहुजी वस्ताद साळवे समाधी पुणे, यमाई देवी कन्हेरसर , दावाडी नीमगाव खंडोबा ,  छत्रपती शिवाजी महाराज समाधी रायगड ,  श्री नेवासे पैस खांब ,मोरया गोसावी चिंचवड ,वृंदावन , मथुरा नरसोबा वाडी मंदिर  ,संताजी घोरपडे समाधी ,विरभूमी कारगिल , हल्दी घाटी राजस्थान ,चक्रधर स्वामी लोणी पारनेर अहिल्या नगर सयाजीराजे गायकवाड जमना बाग रॉयल इस्टेट लक्ष्मी विलास पॅलेस बडोदा , पानिपत रणभूमी ,
सम्यक शिखर जैन धर्मस्थळ , राजे उमाजी नाईक स्मारक पुणे , चतुश्रुंगी माता मंदिर , संत गाडगेबाबा प्रार्थना स्थळ पुणे ,  श्री  संत सावता महाराज आरण गाव समाधी , औंधगावं तालीम , पैसा फंड तळेगाव , डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान तळेगाव ,  डॉ. केशव बळीराम हेडगेवार स्मृती स्थळ नागपूर, 78 कोस परिक्रमा वृंदावन , कुरुक्षेत्र ,अयोध्या श्री राम मंदिर अशा अनेक श्रद्धास्थान , कर्मस्थान , समाधीस्थान , जन्मस्थान , रणभूमी अशा स्फूर्तीस्थानाच्या मातीचे पुजन, भारतमातेचे पुजन स्तोत्रपठण  सर्व क्रांतिकारक,  देशभक्त, संत,समाजसेवक यांच्या प्रतिमेचे पुजन स्मरण करण्यात आले.

See also  आपले संविधान!आपला अभिमान!


अक्षतृतीये निमित्त सार्वजनिक रित्या या सर्व पूर्वजांचे पुजन ही संकल्पना अत्यंत स्फूर्तीदायक आणि व्यापक आहे. अशा पद्धतीने कार्यक्रम करण्याची संकल्पना सुचणं आणि ती राबवणं हेच या कार्यक्रमाचे यश आहे असे गिरीशजी प्रभुणे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमात कुणाचाही विशेष सत्कार संयोजकांनी ठेवला नाही. पद्मश्री गिरीष प्रभुणे यांना बाजीराव धेंडे यांच्या हस्ते संविधान उद्देशीका पत्रक भेट दिले. श्री संजयजी गायकवाड यांना इंद्रजितसिंग मान याच्या हस्ते संविधान उद्देशीका पत्रक भेट दिले.
आणि आलेल्या प्रत्येकाला भारताच्या संविधानाची उद्देशीका पत्रक भेट देण्यात आली.