अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने १५ हजार कुटुंबांना दिपावली सरंजाम वाटप

बालेवाडी : अमोल बालवडकर फाऊंडेशन व भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी भागातील गोरगरीब होतकरू १५ हजा कुटुंबासाठी दीपावली सरंजाम वाटप करण्यात करण्यात आले.
यावेळी ना. चंद्रकांत दादा पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथासंसदिय कार्यमंत्री महा.राज्य), मुरलीधर आण्णा मोहोळ(सरचिटणीस भाजपा महा. प्रदेश तथा मा.महापौर), धिरज घाटे(शहराध्यक्ष भाजपा), श्रीनाथ भिमाले (मा.सभागृह नेते पुणे मनपा) तसेच भारतीय जनता पार्टी कोथरुड (उ) विधानसभा मतदार संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


यावेळी अमोल बालवडकर म्हणाले, खरं तर दिवरात्र मेहेनत घेणारे होतकरू कुटुंब त्यातील बहुतांश नागरिक हे मराठवाडा-विदर्भ-खानदेश अशा विविध भागातून आपल्या परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने बाणेर बालेवाडी परिसराला लखलखाट आहे, हा परिसर पुण्यातील राहण्यासाठी लोकांची प्रथम पसंती आहे कारण हे कुटुंबीय या भागासाठी दिवसरात्र मेहनत घेतात..
अशा कुटुंबीयांना सण उत्सवामध्ये आधार देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो म्हणून या नागरिकांसाठी असे विविध उपक्रम वर्षभर आम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून राबवित असतो त्यांना शक्य ती मदत करत असतो.
परिस्थिती कशीही असो सर्वांना आपल्या हिंदू धर्मातील सण चांगल्या पद्धतीने साजरा करता यावेत, या सणांमध्ये नागरिकांना आनंद मिळावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन प्रभागातील १५००० परिवारांना दिवाळीच्या काळात किंवा सणासुदीच्या काळात आधार म्हणून दरवर्षी दिवाळी सरंजामचे वाटपाचा हा कार्यक्रम शिस्तबध्द व नियोजित पद्धतीने यशस्वी करण्यात येत आहे.


यावेळी नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेवक किरण दगडे पाटील ज्येष्ठ नेते प्रकाश बालवडकर, उपाध्यक्ष गणेश कळमकर, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, पुणे शहर चिटणीस राहुल कोकाटे, पुणे शहर चिटणीस लहुशेठ बालवडकर, पुणे शहर सरचिटणीस पुनित जोशी, कोथरुड (उ) मंडलाचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, युवा नेते शशिकांत बालवडकर, उपाध्यक्ष उमा गाडगिळ, उपाध्यक्ष अनिल ससार, सरचिटणीस शरद भोते, सरचिटणीस सचिन दळवी, उपाध्यक्ष कल्याणी टोकेकर, उपाध्यक्ष मोरेश्वर बालवडकर, उपाध्यक्ष राकेश पाडाळे, उपाध्यक्ष प्रविण आमले, चिटणीस निकिता माथाडे, चिटणीस निलेश सायकर, पुणे शहर भाजपा युवा वॅारीयर्स अध्यक्ष शिवम बालवडकर, युवा मोर्चा अध्यक्ष कोथरुड रोहन कोकाटे, सरचिटणीस युवा मोर्चा अनिकेत चांदेरे, महिला मोर्चा अध्यक्षा अस्मिता करंदिकर, अनुसुचित जाती जमाती अध्यक्ष नितीन रनवरे, प्रभाग अध्यक्ष सुभाष भोळ, राजेंद्र पाडाळे, प्रमोद कांबळे, आत्माराम बालवडकर, अनिल बालवडकर, संतोष बालवडकर, सचिन बालवजकर, ज्ञानेश्वर बालवडकर तसेच सर्व कोथरुड भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सर्व सभासद उपस्थित होते.

See also  बारामती येथे निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न