पुणे – रेंज हिल्स आणि खडकी पोलीस स्टेशन जवळील रेल्वे अंडरब्रीज प्रकल्पाचा आराखडा तयार असून, मान्यतेसाठी तो रेल्वे खात्याकडे पाठविला आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (शुक्रवारी) प्रसारमाध्यमांना दिली.
या प्रकल्पाला रेल्वे खात्याकडून मान्यता मिळताच निविदा मागविण्यात येऊन काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, असे आश्वासन शिरोळे यांनी दिले.
पुणे महानगरपालिकेचे मुख्य अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्याशी रेंज हिल्स व खडकी पोलिस स्टेशनजवळील रेल्वे अंडरब्रिज प्रकल्पाच्या रुंदीकरण संदर्भात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सविस्तर चर्चा केली. या चर्चेमध्ये साडे चार बाय दहा मीटर चे बोगदे प्रस्तावित केले असून त्याचे जीएडी ड्रॉइंग मान्यता करिता रेल्वे कडे पाठवण्यात आले आहे, अशी माहिती देशमुख यांनी आमदार शिरोळे यांना दिली.
तसेच खडकी स्टेशन रोडच्या रुंदीकरणाबाबत आणि नाल्याच्या कामाबद्दल आमदारांनी सविस्तर चर्चा केली.
हे दोन्ही विषय नागरिकांसाठी महत्त्वाचे असल्याने ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
घर ताज्या बातम्या खडकी रेल्वे अंडरब्रीज प्रकल्पआराखडा मान्यतेसाठी रेल्वे खात्याकडे -आमदार सिद्धार्थ शिरोळे