तुंबलेली ड्रेनेज लाईनचे मैलापाणी मंदिरामध्ये, तातडीने कारवाई करा हिंदू दैवतांचा अपमान सहन करणार नाही मनसेचा आंदोलनचा इशारा

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील ई स्केअर थिएटर व विजय हौसिंग सोसायटी मागील एस ई एस गुरुकुल या शाळेमागील रेणुका माता मंदिरासमोर गेला महिना-दिड महिना झाले ड्रेनेज लाईन तुंबली आहे. ड्रेनेज तुंबून त्याचे मैलापाणी तेथील रेणुका माता मंदिरामध्ये शिरत आहे त्यामुळे मंदिर परिसरामध्ये असलेली भगवान शंकराची पिंड व काळूबाई मंदिर पूर्णपणे मैलापाण्यामध्ये झाकले गेली आहे. मैलापाण्याची दुर्गंधी परिसरात पसरली आहे. ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे तेथे चिखल झाला आहे व त्यामुळे तेथे दलदल तयार झाली आहे. त्यामुळे येथे कोणीही पूजा करण्यास येण्यास धजावत नाही. पालिका योग्य कारवाई करत नसल्यामुळे हिंदू देवतांची मैलापाणी मंदिरात जात असल्यामुळे एक प्रकारे विटंबना केली जात आहे.


सध्या उन्हाळयाच्या सुट्ट्या असल्याने जवळच असणाऱ्या खैरेवाडी येथील अनेक लहान मुले याठिकाणी खेळण्यास येत असतात. लहानमुले मैलापाण्याच्या खड्ड्यात पडून जीवितहानी होऊ शकते. मनसेचे शाखा उपाध्यक्ष अविनाश वाईकर यांनी क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगूनही याकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नाही व दुरुस्तीही करत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.


नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता हे ड्रेनेज संबंधितांकडून त्वरित दुरुस्त करण्यात यावी. जर येत्या ४८ तासामध्ये ड्रेनेज दुरुस्त झाले नाही तर होणाऱ्या अपघातास किंवा होणाऱ्या रोगराईमुळे कोणी दगावल्यास आपणास जबाबदार धरले जाईल व मनसे स्टाईल खळ्खट्याक आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेच्या वतीने उपशहर प्रमुख सुहास निम्हण यांनी दिला आहे. याबाबत सहाय्यक आयुक्त, घोले रोड-शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालय, घोले रोड, यांना निवेदन देण्यात आले आहे . यावेळी मनसेचे उपशहर अध्यक्ष सुहास निम्हण, उपविभागाध्यक्ष संजय तोडमल, शाखाध्यक्ष निखिल जोशी, शाखा उपाध्यक्ष अविनाश वाईकर, किशोर इंगवले व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  काँग्रेस पक्ष कार्यालया मध्ये राजकीय भेळभत्ता कार्यक्रम