कोथरूड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जयदीप पडवळ यांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेना शाखा पौड रोड आयडियल कॉलनी या ठिकाणी नेत्रचिकित्सा शिबिर घेण्यात आले शिबिराला 360 नागरिकांनी सहभाग नोंदविला आणि त्यातील 260 नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तसेच सहा नागरिकांचे मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. शिबिराला अनेक मान्यवर नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती नोंदविली .
फक्त महिलांसाठी सदाबहार मराठी लावण्यांचा कार्यक्रम आणि भव्य लकी ड्रॉ सोहळ्याचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि कार्यक्रमाचा आनंद महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात घेतला. कार्यक्रमाला रघुनाथ कुचिक (उपनेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, गजानन थरकुड, संजय मोरे (शहरप्रमुख), राम बोरकर, उमेश भेलके, अजय भुवड, नागेश गायकवाड,संदीप मोकाटे, तुकाराम जाधव, विजय डाकले,किशोर मारणे, विनोद मोहिते,नितीन शिंदे,शारदा वीर,छायाताई भोसले, कस्तुरी पाटील, भारत सुतार,किशोर सोनार, मारुती वर्वे, नवनाथ भगत, दीपक दिघे, प्रकाश दिघे, किरण उभे,योगेश राजापूरकर आणि इतर पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे आणि इतर पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्री. जयदीप पडवळ आणि मित्र परिवार (मा.सभासद पुणे मनपा वृ.प्रा.स ) यांनी केले .