कोथरूड येथे स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त शास्त्रीनगर महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

कोथरूड : स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त शास्त्रीनगर, कोथरूड येथे महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिरामध्ये महिलांच्या संबंधित सर्व आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या व औषध मोफत देण्यात आले. 100 महिलांनी ह्या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. या तपासणीसाठी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.


या शिबिरास पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा पूजा आनंद, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी सरचिटणीस स्वाती शिंदे, कोथरूड ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष रवींद्र माझीरे, कोथरूड ब्लॉक महिला काँग्रेस अध्यक्षा मनीषा करपे, पुणे शहर महिला काँग्रेस उपाध्यक्ष प्राची दुधाने, पुणे शहर महिला काँग्रेस सरचिटणीस सुरेखा मारणे, राजीव गांधी पंचायत राज संघटन उपाध्यक्ष मनीषा गायकवाड, ,विजय खळदकर, कान्हू साळुंखे, सोमनाथ पवार शिवाजी सोनार, युवराज मदगे, विकी खन्ना, रंजना पवार ,नीता पाटोळे, शितल जाधव,सुरेखा पिसे ,हनुमंत गायकवाड, किरण मारणे, रोहन जाधव, अरुण नाईकनवरे, आकाश देवकुळे, माणिक थोरात,विकी कांबळे इ. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.


ह्या शिबिराचे आयोजन राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष किशोर मारणे ह्यांनी केले होते.

See also  ससून सर्वोपचार रुग्णालयातील अमली पदार्थ प्रकरणी चौकशी समिती गठित- मंत्री हसन मुश्रीफ