मावळ कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना, अनेक जण बुडाल्याची भीती

पुणे : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत वीस ते पंचवीस पर्यटक बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी या परिसरात होती, नदीवरील पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाले

घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहेत.

See also  पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार ह्यांचा पोलीस मित्र संघटने तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव